महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पंतप्रधानांसोबत कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेणार्या बैठकीत आज सहभागी घेतला होता. देशात काही राज्यांमध्ये वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. त्याबाबत माहिती देताना राजेश टोपेंनी (Rajesh Tope) महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक नसल्याचं सांगितलं आहे मात्र येत्या काही दिवसांत गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती पुन्हा लागू केली जाऊ शकते असेही संकेत दिले आहेत.
राजेश टोपेंच्या माहितीनुसार, आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जिल्हाधिकार्यांसोबत चर्चा करणार आहेत. नंतर राज्यात पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा करण्याबाबत निर्णय होऊ शकतो असे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोबतच आज पंतप्रधानांनी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, लसीकरण आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं आहे. राज्यात सर्वदूर सध्या ओमिक्रॉन हाच व्हेरिएंट आढळत आहे. मात्र केंद्र सरकारकडून जिनोम सिक्वेनिंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे पुढील लाट रोखण्यास मदत होईल असे सांगितले आहे. Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोविड-19 उपाययोजनांची माहिती .
महाराष्ट्रात लहान मुलांचं लसीकरण वाढवण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी खाजगी केंद्रांवर जाऊन बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन केले आहे.
आज भारतामध्ये जाहीर करण्यात आलेल्या मागील 24 तासांच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात २ हजार ९२७ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद ३२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, तर २ हजार २५२ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.