Coronavirus: पंतप्रध नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोविड-19 उपाययोजनांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडसंदर्भात घेतलेल्या बैठकीत सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोविडची सद्यस्थिती तसेच कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता, राज्य सरकार सक्रियपणे करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.