Raj Thackeray यांची अयोद्धा दौर्‍यापूर्वी 22 मे ला पुण्यात  गणेश कला क्रीडा मंचमध्ये सभा!
Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) 5 जूनच्या अयोद्धा दौर्‍यापूर्वी पुण्यात 'राज गर्जना' करणार अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आता मनसे पुण्यात राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी करत आहे. मनसे अध्यक्ष 22 मे दिवशी पुण्यामध्ये सभा संबोधित करणार आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंचमध्ये संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. यापूर्वी 21 मेला नदीपात्रात सभा घेण्याचा मनसेचा मानस होता पण सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मान्सून बरसण्याची शक्यता असल्याने ही सभा रद्द झाली आहे. हे देखील नक्की वाचा: MNS कडून लालबाग परिसरात पोस्टरबाजी; 'राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल' .

पुणे दौर्‍यातून राज ठाकरे काल (18 मे) रात्री उशिरा मुंबईला परतले. त्यामुळे पुण्यात सभा होणार की नाही? याची चर्चा रंगली होती पण मनसे प्र्वक्ते बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मेला पुण्यात सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार? अयोद्धा दौर्‍यासाठी बृजभुषण सिंग या भाजपा खासदाराने दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान 5 जून दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत अयोद्धा दौरा करणार आहेत. राम लल्लांचं दर्शन घेणार आहेत. मनसे कडून अयोद्धा दौर्‍यासाठी 11 ट्रेन्स बूक करण्यात आल्याचंवृत्तही समोर आलं होतं.

काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून मनसे आक्रमक झाली होती. यामध्ये शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या संदीप देशपांडे, संतोष धुरी यांनाही आज 15 दिवसांनंतर दिलासा  मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.