RajThackeray (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र राज्य अखेर राष्ट्रपती राजवटी खाली गेले आहे. काहीच वेळापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करत हा निर्णय दिला आहे.

अशा परिस्थितीत देशभरातून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्षा राज ठाकरे यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत आपली प्रतिक्रिया मंडळी आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray reaction on President's Rule) म्हणाले, "राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान."

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू; राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांमध्ये सध्या सत्ता स्थापनेच्या समीकरणावर चर्चा सुरु आहे. आणि थोड्याच वेळात महाआघाडीची पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे, तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेना आमदारांना हॉटेल द रिट्रीट येथे भेटायला गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस देणार शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी नवा प्रस्ताव; मुख्यमंत्रिपद दोन्ही पक्षांकडे अडीच-अडीच वर्ष

इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेचा एक नवा प्रस्ताव देण्यात येणार आहे, ज्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे मुख्यमंत्री बनतील जे अडीच-अडीच वर्ष राज्याचा कार्यभार सांभाळतील.

त्यामुळे महाराष्ट्रातील पुढील राजकीय समीकरण काय असणार हे काहीच वेळात स्पष्ट होणार आहे.