Sonia Gandhi, Uddhav Thackeray And Sharad Pawar (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र राज्यात नुकतीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची वाय बी सेंटर येथे बैठक सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि शिवसेनेतील काही बडे नेते हॉटेल द रिट्रीट येथे आपल्या आमदारांना भेटण्यास गेले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाशिवआघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्याच्या दिशेने पाऊलं उचलत आहेत. आणि नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या बैठकीत शिवसेनेला एक नवा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदाची विभागणी होणार आहे. दोन्ही पक्षांचे अडीच- अडीच वर्ष (50- 50 formula in NCP and Shivsena)) हा फॉर्म्युला ठरू शकतो.

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू; राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

आता शिवसेना नक्की या प्रस्तावाला काय उत्तर देते यावर महाराष्ट्राचं पुढील राजकीय समीकरण ठरणार आहे.

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू; राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

सर्वप्रथम भाजप पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु त्यांनी आसामर्थ्य दाखवल्यानंतर शिवसेनेला ती संधी देण्यात आली. मात्र शिवसेनाही सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही आणि अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती.