Raj Thackeray ED Enquiry: राज ठाकरे यांना धाडलेल्या ईडी नोटीशीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया; 'बहु भी कभी सास बनती है'
Bala Nandgaokar (Photo Credits: Facebook)

कोहिनूर मिल प्रकरणी आज मुंबईमध्ये ईडी कार्यालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांची चौकशी होणार आहे. कृष्णकुंज या त्यांच्या राहत्या घरातून राज ठाकरे सहकुटुंब दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात पोहचणार आहेत. यामध्ये मनसे नेतेदेखील राज ठाकरे यांच्या सोबतीला आहेत. सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. लॉ आणि ऑर्डरची स्थिती पाहता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, रवी मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जमावबंदीची नोटीस दिली आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) यांनी वक्तव्य दिलं आहे. Raj Thackeray ED Enquiry Live Updates: कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी चौकशी साठी राज ठाकरे 11 च्या  सुमारास पोहचणार ईडी कार्यालयात पहा लाईव्ह अपडेट्स 

मीडियाशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, ' राजकारण फार टीकत नाही. बहु भी कभी सास बनती है, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. आज राज ठाकरेंसोबर अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर देखील रवाना झाले आहेत.

सध्या कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरेंपूर्वी त्यांचे भागीदार उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची कसून चौकशी झाली आहे. तर काल उद्धव ठाकरे यांनी या ईडी चौकशीतून काहीच बाहेर पडणार नाही असे म्हटले आहे.