मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे मुंबई पोलिसांच्या ताब्यात; मनसैनिकांना जमावबंदीची नोटीस
Sandeep Deshpande Arrest (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडी कार्यालयात हजेरी लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवला आहे. तर सुरक्षा आणि कायद्याचा प्रश्न लक्षात घेत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. शिवाजी पार्क परिसरातून आज मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना शिवाजी पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊ नयेत यासाठी जमावबंदीची नोटीस देखील देण्यात आली आहे.Raj Thackeray ED Enquiry Live Updates: कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी चौकशी साठी राज ठाकरे 11 च्या  सुमारास पोहचणार ईडी कार्यालयात पहा लाईव्ह अपडेट्स 

ईडी कार्यालयात पोहचण्यासाठी सकाळी 10.30 च्या सुमारास राज ठाकरे रवाना होणार आहेत. सध्या मुंबईमध्ये 1 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बेस्ट बसला देखील संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी 'ठाणे बंद' चं आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर ठाणे बंद मागे घेण्यात आला आहे.

ANI Tweet 

सध्या कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरेंपूर्वी त्यांचे भागीदार उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची कसून चौकशी झाली आहे. तर काल उद्धव ठाकरे यांनी या ईडी चौकशीतून काहीच बाहेर पडणार नाही असे म्हटले आहे.