Raj Thackeray (Photo Credis: Twitter)

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोहिनूर मिल प्रकरणी (Kohinoor Mill Case) चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहचले आहेत. सध्या राज ठाकरेंची चौकशी सुरू झाली आहे तर त्यांच्या सोबत निघालेले ठाकरे कुटुंबीय बिलार्ड पिअर या दक्षिण मुंबईतील भागात थांबले आहे. पुढील काही तास राज ठाकरेंची चौकशी चालणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंब आणि काही मनसे नेते 'ग्रॅन्ड' (Grand Hotel) हॉटेलमध्ये थांबले आहेत. राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी सारे ठाकरे कुटुंब हजर राहिला आहे. Raj Thackeray ED Enquiry Live Updates: राज ठाकरे ईडी कार्यालयात; ठाकरे कुटुंबीय 'ग्रॅन्ड' हॉटेलमध्ये

राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली, लेक उर्वशी ठाकरे आणि बहीण जयवंती देशापांडे देखील उपस्थित आहे. ठाकरे कुटुंबियांना ईडी कार्यालयाच्या परिसरातच रोखण्यात आले. त्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी दक्षिण मुंबईमध्ये मुक्काम ठोकला आहे.

ANI Tweet

रविवारी राज ठाकरेंना नोटीस आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणामध्ये ही नोटीस राजकीय सुडबुद्धीने पाठवण्यात आल्याचं मनसे सैनिकांनी मत व्यक्त केलं आहे. काल राज ठाकरेंच्या पाठीशी उद्धव ठाकरे देखील उभे असल्याचं दिसून आलं आहे. या चौकशीतून काही उत्पन्न होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.