Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Maharashtra Rains Update: महाराष्ट्रात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काही जिल्ह्यांत उकाडा जाणवत आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग (Sindhudurg), औरंगाबाद (Aurangabad), परभणी (Parbhani), अहमदनगर (Ahemadnagar), नांदेड (Nanded), धुळे (Dhule) जिह्यांत पुढील तीन तासांत वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नांदेड, धुळे जिह्यांत पुढील तीन तासांत वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला असल्याने नागरिकांनी मोठ्या झाडांखाली वा जवळ उभे राहू नये असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Tips for Farmers: शेतात असताना मेघगर्जना होत असल्यास काय करावे वा करु नये, RMC ने ट्विटद्वारे दिली माहिती

दरम्यान उस्मानाबाद, कराडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे प्रचंड हाल केले आहेत. एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. या पावसामुळे पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. कागल, चंदगड आणि भुदरगड तालुक्‍यातील गारपीट देखील झाली. राज्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत असून नाशिकमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, यापूर्वी मार्च महिन्यात देखील अवकाळी पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली होती.