राहुल महाजने केले तिसऱ्यांदा लग्न
राहुल महाजन आणि नताल्या इलियाना ( फोटो सौजन्य - ट्विटर )

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा सुपुत्र राहुल महाजन याने तिसऱ्यांदा लग्न केले आहे. तर नताल्या इलियाना असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे.

नताल्या ही कझाकस्तान मधील मॉडेल आहे. राहुल महाजनने त्याची प्रेयसी नताल्या हिच्या सोबत मलबार हिल येथील एका मंदिरात लग्न केले आहे. तसेच या लग्नाच्यावेळी मोजकीच मंडळी उपस्थित होती. तर राहुल आणि नताल्या यांची दोन वर्षांपूर्वी कॉमन मित्रांमुळे ओळख झाली होती. या दोघांनी दीड वर्षानंतर लग्न केले आहे.

यापूर्वी राहुल महानने श्वेता सिंग आणि डिंपी गांगुली यांच्या सोबत लग्न केले होते. मात्र या दोघांना घटस्फोट देऊन त्याने आता नताल्या या नव्या प्रेयसीसोबत लग्न केले आहे.