Nana Patole On Rahul Gandhi: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा म्हणजे भगवान श्रीरामाच्या वनवासासारखी, नाना पटोले यांचे वक्तव्य
Nana Patole | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वनवासाची तुलना प्रभू राम यांच्या वनवासाशी केली. ते म्हणाले की, श्री राम यांनी राजपुत्र म्हणून ज्याप्रमाणे वनवास अनुभवला त्याचप्रमाणे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी पदयात्रेसाठी बाहेर पडले आहेत.

राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रातही या भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, प्रभू राम यांनी लंकेपर्यंत अनवाणी प्रवास केला होता. तसेच राजपुत्र समजले जाणारे राहुल गांधीही पदयात्रेला निघाले आहेत. राहुल गांधींचा हा वनवास म्हणजे प्रभू श्री रामाच्या वनवासासारखा आहे.

याशिवाय डिसेंबरमध्ये फडणवीस सरकार पडणार असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकार पडेल असे भाकीत करताना संबंधित महिनाही सांगितला.पुढे नाना पटोले असेही म्हणाले, भाजप हा बहुजनांचा पक्ष नाही. भाजपमध्ये बहुजनांसाठी अडचणी मांडल्या जातात. त्या पक्षात राहून मी स्वतः ते अनुभवले आहे. भाजप नेते पांडुरंग फुंडकर, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि आता पंकजा मुंडे यांचे काय झाले?

या सर्वांना अडचणींचा सामना करावा लागला. या सगळ्याचे भाजपने काय केले हे जनतेने पाहिले आहे. राज्यात हे ईडी सरकार फार काळ टिकणार नाही, डिसेंबरमध्ये हे सरकार पडेल. नाना पटोले म्हणाले, राहुल गांधींचा साधेपणा आणि नम्रता लोकांना आवडते. त्यामुळे लोकांचा पाठिंबा वाढत आहे. हेही वाचा Navratri ची उपासना इतरांना त्रास न देता व्हावी, गरबा, दांडियाला लाऊडस्पीकर, डीजेची गरज नाही - Mumbai High Court

भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांतून ही पदयात्रा निघेल त्या जिल्ह्यातील लोक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतील.भारत जोडो यात्रा हा राजकीय प्रवास नाही. सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र करून देश, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची प्रतिज्ञा घेऊन ही यात्रा काढण्यात येत आहे.