आईच्या मायेसमोर समोर सारे क्षुल्लक असतं. आपलं बाळ तिच्यासाठी सर्वस्व असतं. मग त्याच्या रक्षणासाठी ती कुणाचाही सामना करू शकते. पुण्यात अशाच बहादूर आईने आपल्या 18 महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत सामना केला. ही घटना पिंपरी चिंचवड मधील जुन्नर येथील आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आई आणि बाळ घराबाहेर झोपलं असताना बिबट्या तेथे आला. बिबट्याच्या गुरगुरण्याच्या आवाजाने आईला जाग आली. तिने जेव्हा पाहिलं तेव्हा मुलाच्या डोक्याच्या भाग बिबट्याच्या पंजात होता. मुलाची सुटका करण्यासाठी तिने बिबट्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याने आईकडून होणारा हल्ला पाहून बाळाला सोडलं पण नंतर तिचा हात पकडला. मात्र नंतर आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या निघून गेला. बाळाच्या डोळ्याजवळ, मानेजवळ बिबट्याच्या दातांचे मार्क्स आहेत. त्यानंतर बाळाला नजिकच्या यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आले. viral Video : औरंगाबादच्या खुलताबाद घाटात जेव्हा गाडी समोर बिबट्या आला