Wife Mails Bomb Threat From Husband's ID: नवरा कामात व्यग्र, व्याकूळ पत्नी नाराज; आयटी फर्म बॉम्बने उडविण्याची दिली धमकी, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Husband Wife Relationship | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

[Poll ID="null" title="undefined"]Husband Wife Relationship: पती पत्नीच्या नात्यात वेळेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. दोघांपैकी एकाने जरी त्याकडे दुर्लक्ष केले तर तणावाचे स्फोट व्हायला वेळ लागत नाही. पुणे (Pune) येथे अशीच एक घटना घडली. एका महिलेचा नवरा कामात सतत व्यग्र असायचा. त्याला पत्नीसाठी वेळ देणे जमत नव्हते. परिणामी पत्नी व्याकूळ व्हायची. पतीने वेळ द्यावा यासाठी ना ना तऱ्हेचे प्रयत्न करायची. पण, त्याच्यात बदल होत नव्हता. अखेर पत्नी वैतागली. त्यातून तिने चक्क भलताच कारनामा केला. होय, कारनामाच. या महिलेने चक्क पतीच्या ई-मेल आयडीवरुन पुणे येथील एका आयटी फर्मला (IT Company) बॉम्बने उडविण्याची धमकी (Wife Mails Bomb Threat From Husband's ID) दिली. ही घटना पुणे येथील खराडी येथे सोमवारी (12 जून) संध्याकाळी घडली.

आयटी फर्मला आलेल्या ई-मेलवरुन मोठा गदारोळ झाला. कंपनी व्यवस्थापन हादरुन गेले. कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली. लागलीच पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करुन सदर महिलेला अटक केली आहे. तिच्यावर आयटी फर्मला धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला मंगळवारी (13 जून) दुपारी अटक केली. महिलेविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात कलम ५०६ (२) (गुन्हेगारी धमकी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पुणे शहर पोलीस G-20 परिषद आणि पालखी मिरवणुकीवर बंदोबस्ताला होते. दरम्यान, त्यांना धमकीबाबत कळाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन एका व्यक्तीस तातडीने ताब्यात घेतले. तपासात कळले की, ज्या व्यक्तीच्या मेल आईडीवरुन ही धमकी आली होती तो व्यक्ती आयटी प्रोफेशनल आहे. ज्या कंपनीला धमकीचा ईमेल आला त्या कंपनीत तो पूर्वी नोकरीला होता. मात्र, अलिकडेच त्याने नोकरी बदलली आहे. (हेही वाचा, Mumbai: बायकोला ऑफर, फक्त दीड लाख रुपयांमध्ये नवऱ्याची प्रेयसी 13 दिवसांमध्ये करणार गायब; मुंबई येथून Tantrik Baba गजाआड)

दरम्यान, ज्या महिलेने सदर इसमाच्या ईमेलवरुन धमकी दिली. ती महिला त्या इसमाची पत्नी आहे. ती कोंढवा येथे खासगी कोचिंग सेंटरमध्ये इंग्रजी विषय शिकवते. तिच्या पतीने नुकतीच नोकरी बदलली होती. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला लगेच लक्षात आले की, ईमेलचे पत्ते आणि आयडी वेगळे आहेत. त्यामुळे आम्ही तातडीने आयपी अॅड्रेस ट्रॅक केले. जेणेकरुन आम्हाला आरोपींपर्यंत पोहोचता आले.

पोलिसांनी सांगितले की, या जोडप्यात वारंवार भांडणे होतात. या आधीही दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले होते. मात्र, सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. दरम्यान, महिलेने पुन्हा एकदा तक्रार केली आहे की, तिचा पती तिला वेळ देत नाही. अजूनही तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातून मग तिने त्याला धडा शिकविण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले.