
Pune Weather Prediction, June 20: पुण्यात गेल्या आठवड्या पासून पावसाने सुट्टी घेतल्याचे दिसून येत आहे.पुण्यात आज, 19 जून 2024 रोजी तापमान 28.3 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.89 °C आणि 29.75 °C दर्शवतो. 18 जूननंतर पावसाचा जोर वाढू शकतो आणि जोरदार मान्सून येण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितलेले पण अध्याप ही पावसाने पुण्यात परत हजेरी लावली नाही.सुरवातीला पावसाने पुणे शहरला चांगला झोडपून काढला, मात्र आता पावसाचा जोर कमी आहे. पण येणाऱ्या काही दिवसात पुण्यात ही जोरदार पाऊस लागण्याची शक्यता आहे.तसेच आज पुण्यात ढगाळ वातावरण असेल व संध्याकाळी कदाचित एकदम मध्यम सरी चा पाऊस लागण्याचा अंदाज आहे.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज पाहून तुमचा उद्याचा दिवस प्लॅन करा. हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज!
पुण्यात उद्याचे हवामान कसे असेल?
हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.