Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज!
पाऊस । Photo Credit: Pixabay

Mumbai Weather Prediction, June 20: नैऋत्य मोसमी पावसाचे 9 जून रोजी उपसागरात आगमन झाले होते मात्र 2-3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने काही ठिकाणी सुट्टी घेतल्याचे दिसून आले होते.पण आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी आज सकाळ पासून धो-धोमार पावसाच्या सरी कोसळतायत.व त्यामुळे वातावरणात एक दम गारवा देखील जाणवतोय.आज हवामान खात्याने मुंबई शहराला यल्लो अलर्ट दिला आहे. IMD ने येत्या आठवड्यात मुंबईत मुसळधार ते हलक्या सरींच्या व तीव्रतेसह पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. व येत्या 24 तासात मुंबईत ,मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मात्र सकाळ पासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पानी देखली भरल्याचे दृश्य दिसून आलेत. पुन्हा एकदा नालेसफाई वरती प्रश्नचिन्ह सध्या उभे राहत आहे. जर पाऊस आजून थोडावेळ असाच चालू राहील तर वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. कृपया अंदाजित हवामानानुसार तुमच्या दिवसाचे नियोजन करा.आता नेमके उद्याचे वातावरण मुंबईत कसे असेल ह्या साठी हवामान विभागने उद्याचे हवामान अंदाज वर्तवला आहे.हेही वाचाल: Mumbai Rains Photos and Videos: मुंबईत पावसाचा जोर वाढताच X वर पावसाळी वातावरणाच्या फोटोज, व्हिडिओज शेयर करत यूजर्सनी शेअर केला आनंद

मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? 

आज कोकण किनारपट्टी वर देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईस आज कोंकणात देखील यल्लो अलर्ट देण्यात आला आहे आहे. हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.