पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे (Pune News) शहरावर घोंगावणारे पाणीकपातीचे संभाव्य संकट तूर्तास तरी टळले आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजित धरमांमध्ये येत्या जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लख आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार की काय? अशी चिंता व्यक्त केली जात होती. पण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराला आवश्यक असलेल्या एकूण पाणीकपातीचा आढावा घेण्यात आला. त्यात संभाव्य पाणीकपा येत्या 15 मेपर्यंत टळली आहे. आगामी पाणीकपातीसंदर्भात येत्या 15 मे पासून आढावा घेतला जाणार असून त्यानंतर आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील पालकमंत्रीसुद्धा होते. या बैठकीत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार जुलै महिन्यापर्यंत शहराला सहज पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये आहे. त्यामुळे संभाव्य पाणीकपात करण्याची आवश्यकता नसल्यावर एकमत झाले. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण चार धरणात 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लख आहे. हा पाणी साठी खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांतील आहे. (हेही वाचा, Pune Water Cut News: पुणेकरांनो लक्ष द्या, पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण दिवस बंद राहणार जलपुरवठा)
पाणीकपात सामान्यत: आगाऊ जाहीर केली जाते आणि ती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणे आणि जलाशयांमधील पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित असते. पाणीकपातीच्या काळात, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांचा पाणीपुरवठा कमी केला जातो आणि रहिवाशांना पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला जातो.
पाणीटंचाईच्या परिस्थितीच्या तीव्रतेनुसार पाणी कपातीचा कालावधी आणि वारंवारता बदलू शकते. अत्यंत पाणीटंचाईच्या काळात, पाणीकपात ५०% इतकी जास्त असू शकते, याचा अर्थ दररोज फक्त काही तासांसाठी पाणी पुरवठा होतो. पीएमसी रहिवाशांना पावसाचे पाणी साठवणे, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि उपलब्ध जलस्रोतांचा शाश्वत वापर केला जाईल याची खात्री करण्यासाठी पाण्याचा वापर कमी करणे यासारख्या जलसंधारण उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करते.