पुणे: बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागात भावाचा पिंपरी चिंचवड भागात 12 वाहनांच्या काचा फोडून धुडगुस
Representational Image | (Photo Credits: IANS)

पुण्यामध्ये बहिणीने प्रेम विवाह केल्याच्या रागात तिच्या भावाकडून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात तोडफोड करत धुडगुस घालण्याचा प्रकार झाला आहे. दरम्यान अल्पवयीन भावाने काल (27 ऑक्टोबर) रात्री 11 च्या सुमारास हा प्रकार केला आहे. यामध्ये 5 मित्रांच्या मदतीने कोयते, तलवारी सोबतच दगडफेक करत 10-12 वाहनांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे. Inter-Caste Marriages: आंतरजातीय विवाहासाठी ओडिशा सरकारने लॉन्च केले वेब पोर्टल, प्रोत्साहन निधी 2.5 लाखांनी वाढवला.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, धुडगुस घालणार्‍या अल्पवयीन मुलाच्या बहिणीने पळून जाऊन आळंदी मध्ये प्रेम विवाह केला. यानंतर ती घरी आली मात्र रागात असलेल्या भावाने 11 च्या सुमारास वेताळ नगर परिसरामध्ये आणि राहत्या भागातील काही वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये रिक्षा, मिनी टेम्पो आणि काही दुचाकी वाहनांचा समावेश आहे. तर मित्रांच्या टोळीसह तलवारी, कोयते घेऊन फिरताना या मंडळींनी आरडाओरड केल्याने स्थानिकांची मनात भीती देखील निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

स्वानंद कांबळे यांनी पोलिस तक्रार चिंचवड पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. दरम्यान या घटनेमध्ये ओंकार हजारे (अण्णा), ओंकार कसबे, आदित्य फाळके, मल्हारी दभगडे, लखन डोंगरे आणि अन्य 2-3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. सध्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.