पुणे- माणिकबाग येथे 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला; पोलिसांकडून चौकशी सुरु
Representational Image (Photo Credits: Facebook)

पुण्यात (Pune) एका 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सिंहगड रोड परिसरातील माणिकबाग येथे घडली. याप्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत. संबधित तरुणीच्या आई-वडील बीड येथे गावी आले असून गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्या मुलीचा कॉल लागत नव्हता. यामुळे पालकांनी पुण्यातील राहत्या घरी धाव घेतली. त्यावेळी पालकांना घरात आपल्या मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसात कळवले. घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तेजसा श्यामराव पायाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. तेजसा ही मूळची बीड येथील असून तिने एमबीएसचे शिक्षण घेतले होते. तसेच काही दिवसांपूर्वी ती एका कंपनीत कामाला लागली होती. यामुळे ती पुण्यातील माणिकबाग येथील एका सोसायटीत राहायला आली होती. तेजसा ही गेल्या महिन्याच्या अखेरीस आपल्या आईवडीलांसोबत त्यांच्या गावी गेली होती. तेजसाला कामातून अधिक सुट्टी मिळाल्या नव्हत्या. यासाठी ती गेल्या चार पाच दिवसांपूर्वी पुण्याचा राहत्या घरी परतली. परंतु, तेजसा घरी गेल्यापासून एकदाही फोन आला नाही. तसेच दोन-तीन दिवसांपासून तिचा फोन होता. यामुळे तेजसा हिच्या पालकांनी पुण्याच्या राहत्या घरी धाव घेतली. तेजसाच्या पालकांनी दरवाजा उघडून पाहिले तर, ती मृत अवस्थेत जमीनीवर आढळून आली. त्यानंतर तेजसाच्या पालकांनी पोलिसांना कळवले. सध्या स्थानिक पोलिस याची कसून चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- किरकोळ वादातून मित्रावर गोळीबार करणारे 4 जण पोलिसाच्या ताब्यात

स्थानिक पोलिसांनी तेजसा हिचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसेच याबाबत अधिक माहीती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.