
पार्टी करण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या तरुणाला त्याच्या मित्राणीच गोळीबार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहता (Rahta) तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून त्याच्यावर खून केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आणि झजेवायला गेल्यानंतर किरकोळ कारणांवरुन मित्रांचे आपसाआपसात वाद सुरु झाला. त्यावेळी संतापलेल्या एका जणाने त्याच्याच मित्रावर गोळ्या झाडून तेथून पळ काढला. परंतु, स्थानिक पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक केली. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
फरदीन आबु कुरेशी असे मृत तरुणाचे नाव असून तो श्रीरामपूर तालुक्यात राहत होता. उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी असे या घटनेतील आरोपींचे नाव असून हे सर्वजण फरदीन याचे मित्र आहेत. रविवारी संध्याकाळी फरदीन हा सर्व आरोपींसह जवळच्या हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. दरम्यान, या 5 जणांत किरकोळ विषयावरुन बाचाबाची सुरु झाली. याबाचाबाचीतून एका जणाने फरदीन याला गावठी पिस्तुलाने दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे फरदीन हा गंभीर जखमी झाला. फरदीन याला अहमदनगर येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, फरदीन याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. हे देखील वाचा- मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची निघृण हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदिन याला गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी संबधित ठिकाणाहून पळ काढळा. मात्र, पोलिसांनी त्यांच्या शोध घेऊन सर्व आरोपींना ताब्यात घेतले. या हत्या मागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज स्थानिक पोलिस लावत आहेत.