Pune-Solapur Road Accident: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गाडीचं पंक्चर काढणं तरुणांना पडलं महागात; अपघातात 2 जणांचा मृत्यू
Accident Representational image (PC - PTI)

Pune-Solapur Road Accident: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur Road) झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन तरुण महामार्गावर आपल्या चारचाकी गाडीचं पंक्चर काढत होते. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या कारला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे सारंग प्रकाश रणदिवे, संजय विठोबा अभंगे अशी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, संजय आणि सारंग कामानिमित्त सोलापूरला आले होते. काम झाल्यानंतर ते पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. मात्र, यावेळी त्याच्यावर काळाने घाळा घातला. गाडीचे टायर पंक्चर झाल्याने हे दोघे बाळे येथे एका हॉटेलजवळ थांबले. परंतु, पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संजय आणि सारंगच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र: वेतन थकल्यामुळे रत्नागिरी आणि जळगाव मध्ये एसटी कर्मचा-याची आत्महत्या)

दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऑक्टोबर महिन्यात खडकी हद्दीत पुण्याकडे भरधाव जाणारी मारुती स्विफ्ट गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी या महामार्गावर झालेल्या अपघातात 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

याशिवाय गेल्या दोन वर्षांपूर्वी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या लक्झरी बसच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होतो. तर 13 जण जखमी झाले होते. तसेच 2018 मध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात निगडीतील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव गमवावा लागला होता.