पत्नीचा अश्लील व्हिडिओ (Pornographic Video) बनवून एका व्यक्तीने सोशल मीडियावर प्रसारीत केल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundgarden Police Station) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अनेक दिवसांपासून पतीपासून विभक्त राहत होती. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत या महिलेचे प्रेमसंबंध जुळले होते. याचाच गैरफायदा घेत या महिलेच्या पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचा अश्लील व्हिडिओ बनविला. त्यानंतर त्याने फेसबूकवर बनावट खाते बनवून पत्नीचा अश्लील व्हिडिओदेखील प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
संबधित महिला पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात राहत आहे. तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. एवढेच नव्हेतर, दारू पिऊन घरी आल्यानंतर तो किरकोळ कारणांवरून तिला मारहाण करायचा. या त्रासाला वैतागून तिने 2015 मध्ये पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ती आपल्या आई-वडिलांसह राहत आहे. मात्र, त्या ठिकाणी राहत असलेल्या एका तरूणाशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, या महिलेला प्रियकरासह तिच्या पतीने पाहिल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करून शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्याने गेल्यावर्षी मार्च महिन्यात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची भिती दाखवून तिला ब्लॅकमेल करू लागला. धक्कादायक म्हणजे, त्याने महिलेच्या नावाने बनावट फेसबुकवर खाते उघडले आणि त्यावर तो व्हिडिओ प्रसारित केल्याची माहिती मिळत आहे. Vasai-Virar: आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
याप्रकरणी संबंधित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेला प्रकार चिंताजनक आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे.