पुण्यामध्ये (Pune) 11 वर्षीय मुलीवर तिच्या बापाकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिनाभर या अत्याचाराचा सामना केल्यानंतर शनिवारी (16 ऑक्टोबर) ही घटना समोर आली आणि वाकड पोलिसांनी (Wakad Police) याबाबत संबंधित व्यक्तीला अटक केल्याचं वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडीयाच्या वृत्तानुसार, या घटनेची माहिती मिळताच पीडीतेच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली आहे.
वाकड पोलिस स्टेशनचे सिनियर पोलिस इन्सपेक्टर विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,' मुलीला आरोपी वडिलांनी लैंगिक अत्याचाराची माहिती दिली तर जीव घेतला जाईल अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी महिनाभर तिने तोंड न उघडता अत्याचार सहन केला. मात्र त्रास असह्य झाल्यानंतर तिने सारा प्रकार आईकडे बोलून दाखवला. Ahmedabad Sexual Abuse Case: अनैसर्गिक संभोगाची मागणी करणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात तक्रार, आरोपीस अटक.
जेव्हा मुलीवर होत असलेल्या आत्याचाराची तिने पतिकडे विचारणा केली तेव्हा पतीने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. मग तिने धैर्य गोळा करून पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर बलात्कार, पोक्सो अॅक्ट अंतर्गत तातडीने त्याला अटक देखील करण्यात आली आहे.