Ahmedabad Sexual Abuse Case: अनैसर्गिक संभोगाची मागणी करणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात तक्रार, आरोपीस अटक
Domestic violence | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

गुजरातच्या (Gujrat) अहमदाबादमधून (Ahmedabad) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिथे 45 वर्षीय महिलेने तिच्या पती विरोधात बलात्काराचा (Rape) आरोप करत तक्रार दाखल केली आहे. महिला एका खासगी कंपनीत काम करते, अशी माहिती अहवालात आहे. टीओआयने  दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने शुक्रवारी तक्रार दाखल केली असून तिने 48 वर्षांच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसा (Domestic violence) आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural sex) असल्याचा आरोप केला आहे. या अहवालात माहिती देण्यात आली आहे की, आरोपी एक मोठी आयटी कंपनी चालवतो.

मारहाणीबद्दल तपशील देताना नवरंगपुरा येथील रहिवासी असलेल्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचा 48 वर्षीय पती त्यांच्या लग्ना नंतर काही क्षुल्लक गोष्टींवर तिला मारहाण करत असे. ती पुढे म्हणाली की तो अनैसर्गिक संभोगाची मागणी करत राहिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला चार महिन्यांपूर्वी तिच्या पतीने सोडून दिले होते आणि तेव्हापासून ती तिच्या पालकांसोबत राहत होती. हेही वाचा Uttar Pradesh Rape Case: धक्कादायक ! गोरखपूरमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार, आरोपीस अटक

तिच्या एफआयआरमध्ये, तक्रारदाराने म्हटले आहे की तिचा पती तिच्या इच्छेविरूद्ध अनैसर्गिक संभोगाची मागणी करेल आणि तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करेल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पॉर्न फिल्मच्या प्रभावाखाली असलेला माणूस आपल्या पत्नीला अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडत असे. पतीच्या वागण्यामुळे  नाराज झालेल्या महिलेला प्रत्येक वेळी विभक्त होण्यावर तडजोड करण्यास भाग पाडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

यापुढे दबाव हाताळू न शकल्याने तिने शेवटी पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी सांगितले की घरगुती हिंसा कायदा आणि आयपीसी कलम 377 अनैसर्गिक संभोग अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.