पुण्यामध्ये (Pune) एमपीएससी (MPSC) च्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. हा विद्यार्थी 30 वर्षीय होता. तो मूळचा जालना (Jalna) येथील विद्यार्थी होता. पुण्यात तो एमपीएससी च्या तयारीसाठी आला होता. जानेवारी 2021 पासून तो मित्रांसोबत पुण्यात गांजवे चौकात राहत होता. मित्रांसोबतच तो सरकारी नोकरीच्या प्रयत्नात परीक्षा देण्यासाठी तयारी करत होता. मृत विद्यार्थ्याचं नाव त्रिभुवन कावळे आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, एमपीएसी परिक्षार्थ्याच्या घरात त्याचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला आणि ही घटना समोर आली. पोलिसांना त्याच्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट देखील आढळली. त्यामध्ये त्याने स्वतःकडून अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आपण असमर्थ ठरल्याने आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत लिहलं आहे. तसेच आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. विश्रामबाग पोलिसांकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. मंगळवार 20 सप्टेंबर दिवशी दुपारी त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तेव्हा मित्रांनी दरवाजा तोडला आणि सारा त्यांना त्रिभुवन मृत दिसला. हे देखील नक्की वाचा: Pune: नोकरी न मिळत असल्याने 24 वर्षीय MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिली 'ही' बाब .
पुण्यात आज आपल्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी MPSC करणारे विद्यार्थी पुण्यातील विधान भवना बाहेर आंदोलनासाठी उतरलेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
मागील दोन वर्ष कोविड 19 संकटामुळे स्पर्धा परीक्षांंचे वेळापत्रक कोलमडले आहे. परीक्षा लांबणीवर जाणं, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेत न लावणं आणि निकाल लागला तर अनेक विद्यार्थी अपॉईंटमेंट लेटर मिळण्याच्या प्रतिक्षेत असल्याने अनेकदा यापूर्वीही एमपीएसईच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं पुकारलेली आहेत.