
पुण्यामध्ये (Pune) एका अल्पवयीन मुलाने घरी शिकवणीसाठी आलेल्या महिला शिक्षिकेचे वॉशरूममध्ये छुप्यारित्या व्हिडिओ शूट केल्याचा धक्कादायक प्र्कार समोर आला आहे. या संबंधी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IT Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान 16 वर्षीय मुलाच्या घरी शिकवणीसाठी एक 56 वर्षीय महिला जात होती. हा मुलगा वॉशरूममध्ये छुप्या पद्धतीने कॅमेरा लपवून महिलेचं व्हिडिओ शूटिंग करत होता. एकदा या शिक्षिकेला वॉशरूममध्ये साबणाजवळ काही चमकताना दिसले. तिने तेथील वस्तू बाजूला करून पाहिलं तर तेथे एक मोबाईल आढळला. त्यावेळीस तिला त्यामध्ये शूटिंग सुरू असल्याचं आढळलं. मोबाईल तपासल्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ पहायला मिळाले. हा सारा संतापजनक आणि किळसवाणा प्रकार पाहून महिला शिक्षिकेने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. वाशिम: शाळेतील वर्गमित्राने विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ काढल्याने आत्महत्या .
पाच वर्ष ही महिला शिक्षक मुलाच्या घरी शिकवणी देण्यास जात आहे. त्यामुळे तिच्यासोबत झालेला प्रकार हा मानसिकरित्या देखील धक्कादायक आहे. आरोपी अल्पवयीन मुलावर IPC 354(c) आणि IT ACT 66(e) नुसार गुन्हा दाखल आहे. त्याचा मोबाइल देखील ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन मुलाला चाइल्ड वेल्फेअर कमिटी समोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र सहाणे यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.