वाशिम: शाळेतील वर्गमित्राने विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ काढल्याने आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

राज्यात दिवसेंदिवस बलात्कार, हत्या यांसारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मागील मुख्य कारण म्हणजे लोकांची बदलती जीवनशैली आणि मानसिक अवस्था याला कारणीभुत ठरत आहे. तर वाशिम येथील एका शाळेतील वर्गमित्राने विद्यार्थ्यिनीचा अश्लिल व्हिडिओ काढल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे.

पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी पोलिसात धाव घेत याबाबत अधिक माहिती दिला आहे. त्यांनी पोलिसांना असे सांगितले की, तिच्या वर्गातील मित्राने तिला प्रसाधनगृहात बोलावले. त्यानंतर अजून एका मित्राच्या मदतीने दोघांचा अश्लिल व्हिडिओ काढण्यास सांगितले. या सर्व प्रकारामुळे मुलीला आपल्या प्रतिमेवर लोक हसतील याची भीती वाटत तिने अखेर आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. आरोपी आणि त्याच्या मित्राच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर काही दिवसांपूर्वीच कुर्ला  परिसरात 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या कुटूंबाने केलेली तक्रार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना या आरोपीस पकडण्यात यश आले. या मुलीला सध्या रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.(महाराष्ट्र: महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांची HOME DROP सेवा तर बीड पोलिसांची 'कवच' मोहिम; रात्री- अपरात्री इच्छित स्थळी पोहचवण्यास करणार मदत)

तसेच  या आधी 19 ऑगस्ट रोजी मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाखाली, तिचा भाऊ आणि अन्य तीन लोकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्यांमध्ये मुलीचे आई आणि वडिलांचाही समावेश होता. या मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडल्याचा आरोप आईवर केला होता.