काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये डॉक्टर तरूणीवरून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर देशातील तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. आता या वातावरणात महाराष्ट्रामध्ये मुलींना रात्री-अपरात्री सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःहून खास उपाय योजना करण्यास सुरूवात केली आहे. बीडमध्ये पोलिसांची 'कवच' मोहिम सुरू केली असून त्याअंतर्गत मुलींना रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान प्रवास करणं असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्या मदतीसाठी पोलिस स्वतः मोफत सेवा देणार आहेत. दरम्यान नागपुर पोलिसांनीदेखील अशाच प्रकारे HOME-DROP सेवा सुरू केली आहे.
बीड पोलिसांच्या अधिकृत ट्वीटनुसार, बीड पोलीसांकडून “प्रोजेक्ट कवच” ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. एका फोन कॉलच्या माध्यमातून महिला अअणि तरूणींना रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान प्रवास करणं असुरक्षित वाटत असेल तर त्यांना बीड पोलिस स्वतः सुरक्षित घरी / इच्छित स्थळी पोहचवण्यास मदत करणार आहेत.
बीड पोलिस ट्वीट
बीड पोलिसांचे मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस 'कवच' #buddycop @Harssh_IPS pic.twitter.com/7HivwjlCA3
— SPBeed (@BEEDPOLICE) December 3, 2019
दरम्यान पोलीस कंट्रोल रूम किंवा 1091 या क्रमांकवर फोन करून बीड पोलिसांकडून मदत मागता येऊ शकते. तसेच याकरिता एक मोबाईल अॅपदेखील लॉन्च करण्यात आले आहे.