नागपूर शहर पोलीस रात्री 9 नंतर एकट्या महिलांना सुरक्षीतपणे पोहोचवणार त्यांच्या घरी
प्रतीकात्मक फोटो | (PTI photo)

नागपूर (Nagpur) शहरात रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या आणि घाबरलेल्या महिलांसाठी नागपूर पोलीस (Nagpur Police) विशेष मदत करणार आहेत. ज्या महिलांना घरी पोहोचण्यासाठी रात्री खूप उशीर झाला असेल आणि त्यांना जर असुरक्षित वाटत असेल तर नागपूर पोलीस अशा महिलांसाठी धावून येणार आहेत. या महिलांना पोलीस स्वत: घरापार्यंत सोडणार (Nagpur Police HOME-DROP Facility) आहेत. मात्र, त्यासाठी संबंधीत महिलांना पोलीस नियंत्रण कक्षाशी 100 अथवा 0712-2561222 क्रमांक वापरत फोन करुन तशी कल्पना द्यावी लागणार आहे. नागपूर पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे.

हैदराबाद येथे नुकत्याच घडलेल्या निर्भया बलात्कार हत्या प्रकरणानंतर देशभरातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दिल्ली निर्भया प्रकरणावेळीही देशभरात असेच वातावरण ढवळून निघाले होते. राज्यातही या आधी अनेक वेळा घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यात तणाव निर्माण झाला होता. या सर्व घटना विचारात घेऊन या पुढे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

नागपूर पोलिसांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील काणत्याही भागात रात्री 9 नंतर एखाद्या महिलेस वाहतूकीचे योग्य साधन मिळाले नाही. तर संबंधीत महिला नागपूर शहर पोलिसांशी संपर्क करु शकते. माहितीची विनंती येताच पोलीस स्वत: त्या ठिकाणी जातील. त्या महिलेला आपल्या वाहनात घेतील आणि तिच्या घरी सोडतील. इतकेच नव्हे तर, त्या महिलेला घरी सोडल्यानंतर पोलीस नयंत्रण कक्षाला तसा अहवालही देतील. (हेही वाचा, यंदाच्या पोलीस भरतीमध्ये नवे नियम; आता मैदानी चाचणी फक्त 50 गुणांची)

नागपूर पोलीस ट्विट

डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपूर शहरातील सर्व पोलीस स्टेशन्सना तसे निर्देश सोमवारी दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या निर्देशाचे पत्र मिळताच शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन्सनी या कामी संबंधीत कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली असल्याचे समजते.