
मानवी क्रौर्याची परिसीमा गाठली असे वाटावे अशी धक्कादायक घटना पुणे (Pune Shoker) येथे घडली आहे. शहरातील वारजे येथे अवघ्या 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत. आरोपीने तिला 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला मारून टाकीन' अशी धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 मार्च रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास शहरातीलच उत्तम नगर परिसरातील एका लॉजवर घडली. पीडिता काही कामानिमित्त दुकानात गेली असता आरोपी आणि त्याच्या साथीदाराने तिचे अपहरण केले.
दुचाकीवरुन अपहरण
पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचा दाखला देणाऱ्या या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गौतम अशी आरोपीची ओळख पटली आहे तर, त्याच्या साथीदाराचे नाव अविनाश डोमपल्ले असल्याचे पुढे आले आहे. दोघांनी पीडितेवर पाळत ठेवली आणि तिचे दुचाकीवरुन अपहरण केले. त्यांनी पीडितेस उत्तम नगर परीसरातील पीकॉक लॉजवर नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कथीतपणे राहुल याने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. ती विवाहासाठी तयार व्हावी यासाठी त्याने 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला मारून टाकीन' अशी धमकीही दिली. नंतर त्याने तिच्यावर कथीतपणे बलात्कार केला. (हेही वाचा, Swargate Bus Rape Case: स्वारगेट येथील शिवशाही बलात्कार प्रकरण; आतापर्यंतचा घटनाक्रम आणि ठळक घडामोडी)
चौघांवर गुन्हा दाखल
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार अविनाश अशोक डोमपल्ले याच्यासह लॉज मालक भगवान दत्त मोरे आणि लॉज व्यवस्थापक टिकाराम चपागाई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि त्यांच्या पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Swargate Bus Rape Case Pune: कंडोम, चादरी आणि कपडे; सिगारेट पाकिटांचा खच; पुण्यातील स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणात धक्कादायक प्रकार)
अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत
महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. अनेकदा केवळ मदत न माहितल्याने किंवा होत असलेल्या अन्याय, अत्याचाराबाबत वेळीच वाच्यता न केल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढते. पीडितेवरील अन्याय आणि त्रासही वाढतो. त्यामुळे अशा घटनांना वेळीच विरोध करुन कायदेशीर मदत मिळवणे महत्त्वाचे ठरते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.