Pune Schools Reopens: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) गेल्या 8 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या पुणे महानगर पालिका हद्दीतील शाळा आता 4 जानेवारी पासून पुन्हा सुरु होणार आहेत. मात्र 9 वी ते 12 वी चे वर्ग उद्यापासून सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीती संदर्भात पालकांकडून लेखी संमती पत्र आणावे अशा सूचना ही शाळा प्रमुखांना दिल्या गेल्या आहेत. याआधी नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरु होणार असल्याची चर्चा होती. परंतु अखेर आता उद्या शाळा उघडल्या जाणार आहेत.(COVID-19 Vaccine Dry Run: राज्यासह देशभरात आजपासून कोविड-19 लसीची ड्राय रन)
सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि त्याचे नवे रुप स्ट्रेन मुळे अद्याप भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये कायम आहे. परंतु शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याच्या निर्णयावर पालकांसह विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने प्रतिसाद दिला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांच्याच संमतीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(ITI Admission 2020: 10वी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आजपासून admission.dvet.gov.in वर करता येणार ऑनलाईन अर्ज)
दरम्यान, या आधी पुण्याती शाळा 13 डिसेंबर पर्यंत कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता बंदच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु शाळा कधी सुरु करणार या बद्दल त्याच्या दुसऱ्याच दिवशी संभ्रम ही निर्माण झाला होता. परंतु पालकांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रतिसाद न दिल्याने त्या जानेवारी पर्यंत बंद ठेवल्या जातील असे स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या बाजूला मुंबईतील शाळा अद्याप ही बंदच असून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.