पुणे: रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्यांना महिला चालकाने धडक देत केले 3 कारचे नुकसान, CCTV मध्ये व्हिडिओ कैद (Watch Video)
पुणे: महिलेची कारला धडक (फोटो सौजन्य-ANI)

पुणे (Pune) येथे एका महिलेने रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्यांना धडक दिल्याची बाब समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये महिला कार चालकाने रस्त्यावरील 3 कारचे नुकसान केले आहे.

सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रात्रीची वेळ असून एक कार चालक रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला वारंवार धडक देत असल्याचे दिसून आले आहे. ही घटना 20 ऑगस्टची असून पुण्यातील रामनगर येथे घडली आहे. यामध्ये महिलेने तीन कारचे नुकसान केले असून तिच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.(मुंबई: मुलांच्या शाळेची फी मागणे एका महिलेच्या जीवावर बेतले)

ANI ट्वीट:

या प्रकरणी सदर महिलेने हा प्रकार का केला असावा याबद्दल अधिक तपास केला जात आहे. तसेच रस्त्यांवरुन जाणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा महिला चालकाने कारला कशाप्रकारे वारंवार धडक दिली हे पाहिले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त पोलिसायुक्तांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.