आलिशान पोर्श कारने (Pune Porsche Car Accident Case) रस्त्यावरील दोघांना चिरडल्याच्या घटनेत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (21 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुसऱ्या बाजूला पुणे पोलीसांनीही सक्रियता दाखवत कार चालकाने ज्या बारमध्ये कथीतपणे मद्यपान केले त्याला टाळे ठोकले. शिवाय, चालकाचे वडील विशाल अग्रवाल यांनाही गुन्हे पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणले. दरम्यान, हे कृत्य करणारा अग्रवाल यांचा हा मुलगा केवळ 17 वर्षांचा आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी
पुणे शहरात आपल्या आलिशान पोर्श कारने चिरडून रस्त्यावरील दोघांचे बळी घेणाऱ्या 17 वर्षीय मुलाच्या कृत्याचे वर्णन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'त्रासदायक' असे संबोधून केले. ते प्रसारमाध्यमांसी मंगळवारी (21 मे) बोलत होते. हे कृत्य करणारा 17 वर्षीय मुलगा हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांचा पुत्र आहे. दरम्यान, या प्रकरणात आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये आरोपीच्या वडिलांना झालेली अटक, दाखल झालेला गुन्हा, गुन्ह्याचा तपास यांसारख्या विविध बाबींचा समावेश त्यामध्ये आहे. (हेही वाचा, Pune Car Accident Case: अल्पवयीन आरोपीविरुद्ध एक प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी प्रयत्न करणार; सीपी अमितेश कुमार यांची माहिती)
कोसी बार आणि ब्लॅक बार सील
उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीन आरोपींना दारू पुरवणारे कोसी बार आणि ब्लॅक बार सील केले आहेत. (हेही वाचा: Pune Hit and Run Case: पुणे अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी; मार्चपासून विनाक्रमांक धावत होती गाडी)
एक्स पोस्ट
On the order of Pune District Collector, the Excise Department of the district has sealed Cosie Bar and Black Bar which had allegedly served liquor to the minor accused: Excise Department officials https://t.co/D9bHNZbo6h pic.twitter.com/7KxBNNvIPT
— ANI (@ANI) May 21, 2024
चालकाचा वडिल पोलीस स्टेशनमध्ये दाखल
दरम्यान, पोर्श कार चालकाच्या वडिलांना पुणे गुन्हे पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणले.
व्हिडिओ
#WATCH | Pune Car Accident Case | Father of the minor accused brought to Pune Crime Branch. #Maharashtra pic.twitter.com/kJIP6KVzTV
— ANI (@ANI) May 21, 2024
घटनेतील पीडित आयटी व्यवसायिक
पुणे शहरातील कल्याणी नगर येथे रविवारी (19 मे) पहाटे ही घटना घडली, जिथे एका 17 वर्षांच्या मद्यधुंद तरुणाने कथितपणे चालविलेल्या एका पोर्श कारने अश्विनी आणि अनीश या दोन आयटी व्यावसायिकांना धडक देऊन ठार केले. अश्विनीला हवेत 20 फूट फेकण्यात आल्याचे साक्षीदारांनी सांगितले, तर अनिशला पार्क केलेल्या कारमध्ये फेकण्यात आले. अपघातानंतर प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.