Curfew | Representational Image | (Photo Credits: IANS)

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. 22 डिसेंबर पासून सुरु करण्यात आलेला नाईट कर्फ्यू (Night Curfew) 5 जानेवारी पर्यंत लागू असणार आहे. या काळात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्यात या नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहे. आता संचारबंदी नाही तर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी संदर्भातील आदेश काढले आहेत.

या नव्या आदेशानुसार रात्री 11 ते सकाळी 6 या कालावधीत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. मात्र अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांना या नियमातून मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, पालिका हद्दीत संचारबंदी लागू केल्याने ग्रामीण भागात गर्दी वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर रात्री जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. कालपासून सुरु झालेली जमावबंदी 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. (Night Curfew in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता)

या नव्या नियमांमुळे थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर पाणी फेरलं गेलं असून पर्यटन स्थळांवर होणारी गर्दीही टाळता येऊ शकते. यामुळे पर्यटक नाराज झाले असून पर्यटनस्थळांवरील उद्योग-व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र कोविड-19 संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी काही कठीण नियमांचे पालन करणे अनिवार्य झाले आहे.

दरम्यान, मुंबई शहरातील नाईट कर्फ्यूच्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत. नाईट कर्फ्यूदरम्यान नागरिक घराबाहेर पडून दुचाकी किंवा कारने प्रवास करू शकतात. परंतु, कारमधून केवळ 4 लोकांनाचा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसंच या कालावधीत 5 किंवा त्याहून अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास बंदी आहे. (Night Curfew in Mumbai: मुंबई पोलीस राजी; नाईट कर्फ्यू काळात नागरिकांना दुचाकी, चारचाकीने प्रवास करण्यास सशर्थ परवानगी)

शुक्रवारीच्या अपडेनुसार, राज्यात एकूण 56,823 अॅक्टीव्ह रुग्ण असून 18,06,298 रुग्णांनी कोरनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 94.4% इतका झाला आहे.