Lesbian | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

दोन मुलींना आपापसात चुंबन घेताना रोखले म्हणून दोन तरूणींनी आपल्या साथीदारांसह केअर टेकरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात केअर टेकरचा दात देखील तुटल्याचे माहिती मिळत आहे. ही घटना पुण्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रात घडली आहे. याप्रकरणी पीडत महिलेने संबंधित तरूणींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. यासंदर्भात पुणे मिरोरने वृत्त दिले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय, 64) पुण्यातील कृपा फाऊंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या केअर टेकर होत्या. दरम्यान, चार महिन्यापूर्वी 19 फेब्रुवारी 2021 रोजी, सायंकाळी 5 च्या सुमारास पुण्यातील कृपा फाऊंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात दोन तरुणी एकमेकींचे चुंबन घेत होत्या. त्यावेळी पीडित महिलेने त्यांना रोखले. यामुळे संतापलेल्या तरुणींनी आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने केअर टेकर महिलेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपींनी पीडित महिलेचा दात देखील तोडला. मारहाण झाल्यानंतर पीडित वयोवृद्ध महिला दाताच्या उपचारासाठी मुंबईला गेली. उपचार करुन पुण्याला परत आल्यानंतर शनिवारी त्यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यात एकच खळबळ! कुख्यात गुंड पप्पू वाडेकर आणि अक्षय किरतकिर्वे यांची एकाच दिवशी हत्या

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 324, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटेनाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत. तसेच लवकरच याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येईल, असे अश्वासनही पोलिसांनी दिले आहे.