Pune News: पुणे शहरातील पोलीसांनी (Pune Police) घर भाड देण्याच्या नियमांत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात नुकतेच दोन दहशतवादी (Terrorist) सापडले होते. ते पुण्यात बॉम्बस्फोट (BombSpot) करणार असल्याचे समजले. त्यामुळे पुणे शहर हादरले होते. याच पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. हे दोन दहशतवादी पुण्यात गेल्या दिड वर्षांपासून राहत असल्यामुळे पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते दोघेही मोस्ट वॉटेंड दहशतवादी होते. त्यांचा संबंध जयपुर सीरीयल ब्लास्टशी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे शहरात दहशतवादांचा सावट असल्याचे दिसून येत होतं.
पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून काही हत्यारे आणि संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या. पुण्यातील बहादूर पोलिसांनी दोन दहशतवादांना अटक केली आहे. पुण्यात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. भाडेकरार न करता हे दोन्ही दहशतवादी कोंढवा भागात भाडेतत्वावर राहत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.याच पार्श्वभुमीवर घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात सादर करणे सक्तीचे केले आहे. जर असे न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
पोलिसांनी घर भाड्याने देणाऱ्या सोसायटीला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांनी पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरुला सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहे. तसेच ऑनलाइन भाडेकरुचे व्हेरिफिकेशन केल्यास त्याची एक कॉपी पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक पुणे पोलिसांनी जारी केले आहे.