Heavy Rains In Pune: पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडली; अग्निशमन दल सक्रीय, अडकलेल्या 12 जणांची सुटका
पुणे शहराला मुसळधार पावसाने (Heavy Rains In Pune) झोडपले आहे. सोमवारी रात्री नऊ वाजणेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रात्री उशीर पर्यंत सुरुच होता. पावसाचा जोर मध्यरात्री काहीसा ओसरला तरीही हलक्या सरींची संततधार सुरुच होती. या पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत.
पुणे शहराला मुसळधार पावसाने (Heavy Rains In Pune) झोडपले आहे. सोमवारी रात्री नऊ वाजणेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रात्री उशीर पर्यंत सुरुच होता. पावसाचा जोर मध्यरात्री काहीसा ओसरला तरीही हलक्या सरींची संततधार सुरुच होती. या पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तर अनेक ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रामुख्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान जाले आहेत. दुचाकीवर झाड पडून एक जण जखमी झाल्याचा अपवाद वगळता कोणतीही जीवित हानी झाल्याची घटना घडल्याची माहिती नाही.
दरम्यान, काही नागरिक मुसळधार पावसात अडकून पडले होते. त्यांची सुटका अग्निशमन दलाने वेळीच केली आहे. सुटका केलेल्यांची संख्या 12 असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्ते आणि काही इमारतींमध्येही पाणी साचले. (हेही वाचा, पावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण)
रात्री ११:३० पर्यंत ८१ मिलीमीटर पाऊस !
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सध्या ९ ते ११ किमी उंचीचे ढग सक्रिय आहेत, अशी माहिती सतर्क संस्थेकडून देण्यात आली असून मोठ्या पावसाचे क्षेत्र पुण्याच्या उत्तर- वायव्येकडे सरकत आहे. तर रात्री ११:३० पर्यंत ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. pic.twitter.com/NFphWexAMs
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 17, 2022
पुण्यात पाणी साचलेली काही ठिकाणे
येवलेवाडी स्मशानभूमी परिसरात
सुखसागरनगर
अंबामाता मंदिर
कोंढवा खुर्द
एनआयबीएम रोड
रास्ता पेठ
दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर
डॉल्फिन चौक
बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर
हडपसर
गाडीतळ
शिवाजीनगर पोलिस मुख्यालय
मंगळवार पेठ
शिवाजी स्टेडियम
कसबा पेठ
फिश मार्केट जवळ
कुंभारवाडयासमोर
नारायण पेठ
मोदी गणपती
औंध
डिएव्ही स्कुल गल्ली
पवळे चौक
भुतडा निवास – पर्वती
मित्रमंडळ चौक
गंज पेठ
भवानी पेठ
पडझड
दरम्यान, पर्वती येथील रमणा गणपती परीसरात एक भींत कोसळली, हडपसर, आकाशवाणी,चंदननगर,बिडी कामगार वसाहत आदी परिसरात झाडे रिक्षावर कोसळल्याच्या घटना घडल्या. एका ठिकाणी दुचाकीवर झाड कोसळ्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वारास नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसऱ्या बाजूला मंगळवार पेठेत एक कुटुंब पाण्यात अडकले होते. अग्निशमन दलाने या कुटुंबाची सुटका केली. तर भाजप मंडई येथेही पाण्यात अडकलेल्या सात जणांची सुटका अग्निशमन दलाने केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2022 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

