पावसाळ्यात मका खाणे आरोग्यासाठी आहे खूपच हिताचे, फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
Sweet Corn (Photo Credits: PixaBay)

पावसाळा सुरु झाला की आपली आपोआप पावलं वळतात ती मक्याकडे (Corn). पावसात थंडगार हवेत गरमागरम भाजलेल्या मक्यावर लिंबू आणि मसाला लावून खाण्याची मजाच काही और असते. त्यामुळे आपण कुठे सहलीला गेलो, ट्रेकिंग ला गेलो तर मका आर्वजून खातोच. बाजारात वर्षाचे 12 महिने मका मिळतो. पण तो खाण्याची खरी मजा असते ती फक्त आणि फक्त पावसाळ्यातच. यात मग काही जण स्वीटकॉर्न म्हणून मका खातात तर काही मक्याचे दाणे गरमागरम भाजून खातात.

पण तुम्हाला माहित नसेल की, पावसाळ्यात खाल्ला जाणारा मका हा शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि आरोग्यदायी असा आहे. जाणून घ्या मका खाण्याचे 10 जबरदस्त फायदे:

1. मका खाल्ल्याने तुमचे दात खूप मजबूत बनतात. म्हणून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मक्याचे सेवन करावे

2. मक्याला शिजवल्यानंतर त्यात अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढते. त्यामुळे याचे सेवन केल्याने वाढत्या वयाचा प्रभाव दिसणे कमी होते. तसेच यातील फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

3. आयुर्वेदात मक्याला वातकारक, पित्तनाशक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शिजलेला मका खाल्याने आपल्या शरीराला आवश्यक असे फायदे होतात.

4. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते.

5. पावसाळ्यात ताजा मका पाण्यात उकळून खावा आणि त्याचे पाणी गाळून त्यात साखर मिसळून प्यायल्याने लघवीच्या जागेवर जळण दूर होते.

6. मका टीबी रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. टीबीचे रुग्ण जर रोज मक्याच्या पिठाची पोळी खात असेल तर त्याचा खूप चांगले परिणाम शरीरावर होतील.

7. मका हा मुतखड्यावर जालीम उपाय आहे. मक्याचे केस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्यास शरीरास ते फायदेशीर आहे.

8. एनीमिया च्या रुग्णांसाठी मका खूपच महत्त्वाचा आणि फायदेशीर असा उपाय आहे. यात मॅग्नेशिअम, आयरन, कॉपर, विटामिन बी, फोलिक अॅसिड आणि फॉस्फरस असल्याने तुमची हाडे मजबूत होतात आणि एनीमियाची समस्या दूर होते.

हेही वाचा- पावसाळ्यात या '5' नैसर्गिक पदार्थांनी वाढवा तुमची इम्युनिटी!

9. गर्भवती असणा-या महिलांनी मका खाल्ल्यास त्यांच्या शरीरास खूप लाभदायक असे फायदे मिळतात. मक्यामध्ये फोलिक अॅसिड असल्याने गर्भवती महिलांसाठी मका खूपच फायद्याचा आहे.

10. तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठी मका महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यासाठी तुम्ही मक्याचा स्टार्च चा वापर करु शकता.

याशिवाय श्वासांसंबधित तुम्हाला काही आजार असतील तर मक्याच्या सेवनाने ते पुर्ण दूर होतात. त्यामुळे अशा या गुणकारी, लाभदायी, हितवर्धक अशा मक्याचे सेवन तुम्ही अवश्य करा.