Mumbai-Pune-Mumbai (Photo Credit - Twitter)

रेल्वे प्रवासात प्रवाशांची भांडणे आता नवा विषय राहिला नाही. मुंबई लोकल ट्रेनमधील (Local Train) अनेक व्हिडिओ या आधी व्हायरल झाले आहेत. त्यातले दोन व्हिडिओ तर अगदी पाठिमागच्या काही दिवसांपूर्वीचेच आहेत. त्यानंतर आता पुणे रेल्वेतील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात पासधारक प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांच्यात संघर्ष झाल्याचे पाहायला मिळते. सिंहगड एक्स्प्रेसच्या (Sinhgad Express) बोगीत हा प्रकार घडला. दोन्ही प्रवाशांमध्ये झालेली हाणामारी पाहून इतर प्रवासी मध्ये पडले आणि त्यांनी दोन्ही गटांना बाजूला केले.

प्राप्त माहतीनुसार, मुंबई-पुणेदरम्यान सिंहगड एक्सप्रेसमधून काही प्रवासी नियमित प्रवास करतात. यातील काही प्रवासीही हे पासधारक असतात. दरम्यान, सिंहगड एक्सप्रेस बुधवारी (12 ऑक्टोबर) सकाळी चिंचवड स्टेशनवर दाखल झाली. या वेळी प्रवाशांमध्ये जागा पकडण्यासाठी एकच झुंबड पकडली. या वेळी पासधारक प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांच्यात जागा पकडण्यावरुन वादावादी झाली. हा वाद टोकाला गेला आणि किरकोळ वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. उपस्थित प्रवाशांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वाद अधिक वाढला नाही.

ट्विट

पिंपरी चिंचवडसाठी एक खास बोगी असावी अशी मागणी पाठिमागील काही दिवसांपासून होत आहे. सिंहगड एक्सप्रेसमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर त्याला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, प्रवासी संघटना आरोप करत आहेत की, वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीला प्रशासन नेहमीच केराची टोपली दाखवते.