पुणे येथील विश्रांतवाडी नजीकच्या एका कचऱ्याडब्यात नवजात बालकाचे शव मिळाल्याची घटना घडली आहे. तर एका पातळ कापडाच्या आतमधून काही हालचाली होत असताना दिसून येत होत्या. हे सर्व सफाई कामगाराने पाहिले असता त्याने तातडीने पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहतच कचऱ्याडब्यातील नवजात बालकाला बाहेर काढत त्याची नंतर एका आश्रमात देखभाल करण्यासाठी पाठवले आहे.
सफाई कामगार लक्ष्मी ढेमरे यांनी असे सांगितले की, 19 वर्षापासून स्नेहगंध सोसयटी मध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. लक्ष्मी यांनी सार्वजनिक कचऱ्याडब्यात फेकून देण्यात आलेल्या कापडाच्या आतमधून काही हालचाली सुरु असल्याचे दिसले. त्यावेळी नवजात बालकाला त्याच्या गळ्याच्या येथून आवळून बांधण्यात आले असल्याचे त्यांनी पोलिसांना स्पष्ट केले.या नवजात बालकाला कचऱ्याडब्यातून बाहेर काढण्यात आले आहे. ससून रुग्णायात त्या बालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अनाथ आश्रमात पाठवण्यात आले आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(धक्कादायक! नवजात बाळाला 6-6 बोटं म्हणून नर्सने कापले एक-एक बोटं; बाळाचा मृत्यू)
काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयात अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला शौचालयात सोडून पळ काढल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तर सदर महिला घटस्फोटीत असून मुंबईतील एका सलूनमध्ये नोकरी करत होती. दरम्यान, तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यातून ती गरोदर राहिली. याबाबत या महिलेच्या घरीच काहीच माहिती नव्हती. यासाठी या महिलेने असे लज्जास्पद कृत्य केले. महिलेने सायन रुग्णालयाच्या शौचालयात जन्म दिला असल्याचे तिने सांगितले आहे.