उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील सरकारी रुग्णालयात नर्सच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू (Newly Born Baby Dies) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाच्या हाताला 6-6 बोटं होती. त्यामुळे नर्सने त्याच्या हाताची दोन बोटं कापली. त्यानंतर काही वेळातच या नवजात बाळाने जीव सोडला. दरम्यान, बाळाच्या वडिलांनी महिला आरोग्य कर्मचारी विद्या देवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विद्या यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.(हेही वाचा - नवी मुंबई: दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेत परिक्षेदरम्यान दुर्दैवी मृत्यू)
शनिवारी रात्री उत्तर प्रदेशमधील बाढ करेंखा गावातील रहिवासी लक्ष्मी यांना प्रसूतीसाठी बिलग्राम येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. रविवारी लक्ष्मी यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाच्या दोन्ही हाताला पाच ऐवजी 6-6 बोटं होती. त्यानंतर विद्या या आरोग्य कर्मचारी महिलेने बाळाच्या दोन्ही हाताची एक-एक बोटं कापली. त्यानंतर या बाळाची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - कोपर- दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू
बाळाचे बोटे कापणासाठी आरोग्य सेविकेला परवानगी देण्यात आली होती की, नाही यासंबंधी पोलिस तपास करणार आहेत. या घटनेमुळे बाळाच्या कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. सरकारी रुग्णालयांत अनेकदा आरोग्य सेवकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना होत असतात. त्यामुळे कुटुंबियांनीदेखील योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.