नवी मुंबई (Navi Mumbai) येथील एका दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेतील परिक्षेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर विद्यार्थिनी शाळेत चाचणी परिक्षा देण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला आहे. परंतु विद्यार्थिनीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल स्पष्ट झालेले नाही.
सायली जगताप असे विद्यार्थिनीचे नाव असून ती वाशी येथील मॉर्डन शाळेत शिकत होती. शाळेतील चाचणी परिक्षेला सायली गेली असता तिला प्रथम तिची बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास सांगितली. सायली बॅग ठेवण्यासाठी बाहेर गेली असता तिथेच ती खाली कोसळून पडली. या घटनेनंतर काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सायली हिला फिट आल्याची शक्यता व्यक्त केली.(राज्याच्या विविध भागातील पुरस्थिती पाहता MPSC च्या वतीने आयोजित 'दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा' 1 सप्टेंबर रोजी होणार)
या प्रकारानंतर तिला रुग्णालयात उपचारासाछी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. परंतु काहीजणांनी सायली हिचा मृत्यू अभ्यासाच्या तणावातून मृत्यू झाल्याचा अंदाच काहीजण व्यक्त करत आहेत.