राज्याच्या विविध भागातील पुरस्थिती पाहता MPSC च्या वतीने आयोजित 'दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा' 1 सप्टेंबर रोजी होणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-संग्रहित, संपादीत प्रतिमा)

महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका तेथील स्थानिकांना बसला असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र MPSC च्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परिक्षा 2019' ही आता 1 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परिक्षा 18 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र ती आता रद्द करण्यात आली असून त्याबद्दल एक पत्रक काढले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे निर्माण झालेल्या असाधारण नैर्सगिक परिस्थितीच्या कारणास्तव आयोजिक करण्यात आलेल्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा आता 18 ऑगस्ट (रविवार) होणार नसल्याची सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे.(Konkan Rain: कोल्हापूर, सांगलीला सरकारने दिला मदतीचा हात, तर कोकणातील पूरस्थितीकडे सरकारने फिरविली पाठ, कोकणवासियांमध्ये नाराजीचा सूर)

तसेच परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आयोगाच्या अर्ज प्रणालीद्वारे सुधारित प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे या सुधारित परिक्षेच्या वेळापत्रकानुसार उमेदवारांनी परिक्षेस हजर रहावे असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.