पुणे ते मुंबई दरम्यान इंटरसिटी गाड्यांसह अनेक रेल्वे गाड्या 9 ते 11 ऑगस्टपर्यंत रद्द
Representational Image (Photo Credits: Youtube)

राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला झाला असून पुणे ते मुंबई (Pune-Mumbai) दरम्यान इंटरसिटी गाड्यांसह अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द करण्यात आलेल्या गाड्या 9 ते 11 ऑगस्टपर्यंत पुणे ते मुंबई दरम्यान धावणार नाहीत. तसेच कोल्हापूर येथील पुरस्थितीमुळे तेथे जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने उद्यापासून (9 ऑगस्ट) ते 11 ऑगस्टपर्यंत पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस,प्रगती एक्सप्रेस, मुंबई-गदग-मुंबई एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि भुसावळ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसच हुबळी-मिरज, एलटीटी एक्सप्रेस, हपा-मडगाव-हपा, कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.(मुंबई रेल्वे सुरु करणार विशेष 'बोट पथक', पूर आल्यास नागरिकांची करणार मदत)

मात्र पुणे येथून कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, पनवेल-नांदेड एक्सप्रेस आणि पनवेल-नांदेड विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. या रद्द करण्यात आलेल्या गाड्या राज्यात पडत असलेला पाऊस आणि कर्जत-लोणावळा दरम्यान दरड कोसळल्याने सुद्धा अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.