महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात पुणे मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर राज्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. यावर भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यामुळे मेट्रोच्या कामाची चाचणी निश्चितच त्यांच्या हस्ते होईल. मात्र, जेव्हा काम पूर्ण होईल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतास प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी पुणे मेट्रोबाबत भाष्य केले आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते आज सरकारमध्ये आहेत. ते निश्चितच त्यांच्या हस्ते होईल आणि इतर कोणाच्या हस्ते होणार नाही. मात्र, ज्यावेळी हे काम पूर्ण होईल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी दिली आहे. यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करू. सरकार येतात आणि जातात. यामुळे हा काही श्रेयवादाचा विषय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा-Nitesh Rane On Maharashtra Government: 'हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?' राज्यातील अनलॉक प्रक्रीयेवरुन नितेश राणे यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, देशभरात मेट्रोचे काम सुरू असून पुण्यातील अधिक वेगाने काम सुरु आहे. याबद्दल महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे. पुण्यातील मेट्रोचे काम आतापर्यंत जवळपास 60 टक्के झाले आहे. यामुळे दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील निर्बंधाबाबतही भाष्य केले आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे पुण्यातील व्यापारी, दुकानदारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. सध्या पुण्यातील रुग्णांचा दर टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे सरकारने पुण्यातील व्यापाऱ्याला आणि उद्योगाला दिलासा दिला पाहिजे. तसेच मदत केली गेली पाहिजे आणि त्यांच्यावरील निर्बंध कमी केले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.