पुण्याच्या (Pune) चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरामध्ये एटीएम मशिन मधून पैसे लुटण्यासाठी चक्क आयईडीचा ब्लास्ट (IED Blast) करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आज (20 जुलै) पहाटे घडलेल्या या चोरीमधून 28 लाख रूपये घेऊन चोर पसार झाल्याची बाब पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) दिली आहे. हा प्रकार भांबोळी मधील ATM kiosk मधील आहे. आधारण पहाटे अडीजच्या सुमारास हा प्रकार घडला असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एकापेक्षा अधिक टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.
'Deputy commissioner of police (DCP) Manchak Ippar यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध फूटेजच्या आधारे लावण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, ATM kiosk मध्ये चोरीसाठी दोन जण आले होते. त्यांनी आयईडीचा स्फोट केला आणि मशीन फूटले. यावेळी त्यांनी ट्रे मध्ये पैसे गोळा केले. काळोख असल्याने काही नोटा इतरत्र पडल्या होत्या पण त्यांना दिसल्या नसाव्यात त्यामुळे काही रक्कम उरली आहे. बॅंकेने दिलेल्या माहिती नुसार एटीएम मध्ये 40 लाखांच्या आसपास पैसे होते'. असे इंडियन एक्सप्रेसचे वृत्त आहे. ATM मधून पैसे काढल्यानंतर ताबडतोब करा 'हे' काम अन्यथा होऊ शकते फसवणूक!
पुण्यामध्ये अशाप्रकारे एटीएम मशीन जवळ स्फोट घडवून पैसे लुटण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी रांजणगाव मध्येही झाला आहे. त्यामुळे आता या दोन्ही घटनेमधील समान धागे देखील शोधले जात आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्राईम ब्रांच सह डॉग स्क्वॉड घेऊन घटनास्थळी तपास सुरू केला आहे.