पुणे: नवरा-बायकोच्या भांडणात 6 वर्षीय चिमुरडीची पोटच्या आईकडूनच हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पुणे (Pune) येथे नवरा बायकोच्या वादातून चक्क 6 वर्षीय चिमुरडीची पोटच्या आईकडूच हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली असून याबद्दल अधिक तपास केला जात आहे. तर दोन्ही नवरा-बायको हे उच्चशिक्षित असून ही त्यांच्याकडून असा प्रकार घडला आहे.

गंगाधाम सोसायटी येथे एक विवाहित दांपत्य राहत होते. त्यांना अक्षरा नावाची सहा वर्षीय लहान मुलगी सुद्धा होती. तर गेल्या चार वर्षांपासून ते मुंबईत राहत असून यापूर्वी अमेरिकेत राहत होते. तसेच अक्षरा हिचा जन्म ही अमेरिकेत झाला होता. परंतु पुन्हा एकदा अमेरिकेत जाण्यासाठी नवऱ्याने तिकिट सुद्धा काढले होते. पण बायको अमेरिकेत पुन्हा एकदा जाण्यास नकार देत होती. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तसेच बायकोने तिच्या घरातील मंडळींपैकी काहींना घरी बोलावून नवऱ्याची अमेरिकेला जायची अट त्यांच्यासमोर मांडली. त्यावेळी त्यांनी सुद्धा अमेरिकत परत असे महिलेला सांगितले. परंतु महिलेला ही गोष्ट अमान्य होती आणि ती कोणाचे ही ऐकण्यास तयार नव्हती. यामुळे संतापलेल्या महिलेने चक्क त्यांची मुलगी अक्षरा हिला स्वयंपाक घरात नेऊन त्याचे दार बंद करत तिच्या हातावर चाकूने वार केले. महिलेच्या या संतापजनक प्रकारामुळे बिचाऱ्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.(कुलाबा: मित्राच्या साडेतीन वर्षाच्या मुलीला 7 व्या मजल्यावरून फेकून दिले; मुलीचा मृत्यू, आरोपीला अटक)

या प्रकरणी सदर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच महिलेवर गेल्या चार वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरु असल्याचे घरातील मंडळींनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जात आहे.