प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

मुंबई: नुकतेच जगातील सुरक्षित शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीमध्ये देशातील दोन महत्वाची शहरे मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) यांचे स्थान घसरलेले दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर शनिवार 7 सप्टेंबर म्हणजे आज संध्याकाळी मुंबईमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीने राहत्या इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून आपल्या मित्राच्या मुलीला चक्क फेकून दिले आहे. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. एस.एस. निशंदर, डीसीपी झोन ​​1 (SS Nishandar, DCP Zone 1) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईच्या सुखवस्तू कुलाबा (Colaba) परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतले आहे व त्यांच्या पुढील तपास चालू आहे. मात्र या घटनेबाबत इतर काही माहिती मिळू शकली नाही. मुख्य म्हणजे असे कृत्य करण्यामागे आरोपीचा काय हेतू होता किंवा त्यामागचे नक्की कारण काय आहे याबाबत पोलीस तपास करीत आहेत. (हेही वाचा: World’s Safest City: टोकियो ठरले जगातील सर्वात सुरक्षित शहर, कराची शेवटच्या पाचमध्ये; जाणून घ्या दिल्ली आणि मुंबईचे स्थान)

दरम्यान, मुंबईमध्ये  इमारतीवरून उडी मारून आत्महत्या झाल्या असल्याच्या घटना याधीही घडल्या आहेत. याआधी मंत्रालयाच्या इमारतीवर चढून एका इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर मंत्रालयाला लोखंडी जाळीचे आच्छादन चढवण्यात आले.