Helmet Mandatory in Pune: पुण्यामध्ये 1 एप्रिल पासून हेल्मेट वापरणं सक्तीचं
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

बाईक चालक पुणेकरांसाठी (Pune) आज 1 एप्रिल पासून हेल्मेट वापर सक्तीचं झालं आहे. जिल्हाधिकार्‍यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नव्या नियमावली नुसार, चार वर्षांवरील प्रत्येकासाठी हेल्मेट वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. नियम मोडणार्‍यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार आहे.

पुणे प्रशासनाने त्यांचं आदेशाचं समर्थन करताना दुचाकी हे रस्ते अपघातांमधील मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक दुचाकीस्वारांना डोक्याला गंभीर जखमा होतात. यामध्ये हेल्मेट न घातल्याने त्या जीवावर बेततात. नक्की वाचा Smart Helmet वाचवेल चालकाच्या जीवासोबतच इंधन; वाराणसी येथील Ashoka Institute of Technology and Management च्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग .

एका वरिष्ठ अधिकार्‍याने FPJ ला दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाच्या तुलनेत दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 62% मृत्यू हे डोक्याला धक्का लागल्याने झाले आहेत. हेल्मेट घातलेल्यांमध्ये 80% शक्यता ही ते बचावण्याची असते. त्यामुळे आता हेल्मेट सक्तीचं करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.

पुणे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, राज्य उपक्रम, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये दुचाकी वाहने वापरणाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.

दुचाकी चालवताना हेल्मेट न घालता एखाद्या व्यक्तीने शासकीय आवारात प्रवेश केल्यास मोटार वाहन कायदा, 1988 मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. कलम 129 चे उल्लंघन झाल्यास प्रशासन कठोरपणे कारवाई करेल. मोटार वाहन कायदा, 1988, असेही सांगण्यात आले आहे.