Helmet (Photo credit: Pixabay)

वाराणसी (Varanasi) मधील अशोका इंस्टीट्युड ऑफ टेक्नोलॉजी आणि मॅनेजमेंटच्या (Ashoka Institute of Technology and Management) विद्यार्थ्याने एक स्मार्ट हेल्मेट (Smart Helmet) बनवले आहे. हे हेल्मेट तुमच्या जीवासोबत इंधनाचीही बचत करेल. या हेल्मेटमध्ये सेन्सर्स बसवलेले असून ट्रॅफिक सिग्नलजवळ हे सेन्सर आपोआप बाईक स्लो करतात. ट्रॅफिक सिग्नलच्या 50 मीटर अंतरावर आल्यावर हे सेन्सर अॅक्टिव्हेट होतात. यामुळे बाईकमधील पेट्रोलची सुद्धा बचत होते.

इंस्टिट्युड मधील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार. हे हेल्मेट  Radio Frequency transmitter वर काम करतं. या स्मार्ट हेल्मेटमध्ये दोन ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर आहे. रिसिव्हर हा बाईकमध्ये इन्स्टॉल केला जातो. वाहनचालकाने हेल्मेट घातल्यावर त्यातील ट्रान्समीटर अॅक्टीव्हेट होतो आणि बाईक चालू केल्यावर बाईकवरील रिसिव्हर चालू होऊन हेल्मेटला कन्टेक्ट होतो.

दुसरा ट्रान्समीटर हा ट्रॅफिक सिग्नलवरील भागात लावला जातो. या ट्रान्समीटरच्या रेंजमध्ये कोणतीही गाडी आल्यास तो त्या गाडीला रेड सिग्नलचे ट्रॉन्समिशन देतो आणि गाडीवरील रिसिव्हर गाडी थांबवतो.

रस्त्यावर एखादा अपघात झाला असल्यास हेल्मेटमधील सेन्सर अपघात झालेल्या ठिकाणाचे लोकेशन पोलिस, अॅम्बुलन्स आणि कुटुंबियांना पाठवला जातो. या स्मार्ट हेल्मेटमध्ये अजून काही नवीन बदल घडवून याच्या पेन्टेटसाठी विद्यार्थी अर्ज करणार आहेत आणि त्यानंतर याचा व्यावसायिक स्वरुपातील वापर सुरु होईल.