Pune Grahak Peth (Photo Credits-ANI)

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात आपले थैमान घातले आहे. याचा फटका भारतासह महाराष्ट्राला सुद्धा बसला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र नागरिकांना सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिशन बिगीन अगेन नुसार आता राज्यात Unlock 1 च्या Phase नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याच दरम्यान आता पुण्यातील (Pune) ग्राहक पेठ (Grahak Peth) यांच्या दुकानाने त्यांच्याकडील वस्तूंवर 'स्वदेशी' (Swadeshi)आणि 'विदेशी'(Videshi) असे लेबल लावले आहेत. तसेच ग्राहक पेठ यांनी 'आत्मनिर्भर भारत अभियान'  (Atmanirbhar Bharat Abhiyan) या मोहिमेला सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.

ग्राहक पेठ यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, कारण नागरिकांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँन्ड कोणता आहे हे माहिती नाही. त्यामुळेच दुकानात स्वदेशी आणि विदेशी अशी वर्गवारी करुन गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.(BMC Guidelines: मुंबईत सोमवार- शनिवार दरम्यान मार्केटसह दुकाने सुरु करण्यास परवानगी; मार्केट कॉम्पेक्स आणि मॉल्स राहणार बंद)

दरम्यान, पुण्यात कोरोनाचे एकूण संक्रमित रुग्ण 9877 असून  413 जणांचा बळी गेला आहे. तसेच 5743 जणांची प्रकृती सुधारली आहे. पुण्यात सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनचे नियम जरी शिथील केले असले तरीही नियमांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास त्याचा आकडा 88529 वर पोहचला असून आतापर्यंत 3169 जणांचा बळी गेला आहे.